खुशखबर ! डिलिव्हरी बॉय, कंत्राटी कामगारांना मिळणार पेन्शन
कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या ‘गिग’ कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. या कामगारांना पेन्शन आणि आरोग्यसेवा यासारखे सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचे धोरण तयार केले जात असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. देशात गिग व्यवहार आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित 65 लाख कामगार आहेत. या क्षेत्रात होत असलेली झपाट्याने वाढ लक्षात घेता ही संख्या 2 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असं मांडविया यांनी सांगितले. त्यामुळे डिलिव्हरी बॉयलाही फायदा होण्याची शक्यता आहे