Wed. Feb 5th, 2025

घरबसल्या 2 मिनिटात मिळवा ई-पॅन कार्ड ऑनलाईन लिंक…

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी आपल्याला पॅन कार्ड काढायचे असेल तर त्याची लिंक काय असेल त्याची माहिती आपण बघणार आहोत

एनएसडीएलच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा? सर्वप्रथम तुम्हाला एनएसडीएल ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल.

यासाठी तुम्ही

https://www.onlineservices.nsdl. com/paam/requestAnd Downloa dEPAN.html https://www.onlineservices.nsdl. com/paam/requestAnd Downloa dEPAN.html

या अधिकृत वेब साईटला भेट

द्या.

यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार आणि जन्मतारीख दिलेल्या पर्यायत भरा. यानंतर डिटेल्स चेक करा आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारा.

त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा पॅन 2.0 हा नवीन पॅन कार्ड तयार होईल. पॅन कार्ड जारी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत तीन विनंत्या विनामूल्य केल्या जाऊ शकतात. त्यानंतरच्या विनंतीलासाठी तुम्हाला जीएसटीसह 8.26 रुपये खर्च करावे लागतील. पेमेंट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर ई-पॅन येईल. कोणतीही अडचण आल्यास

tininfo@proteantech.in ईमेल किंवा 020-27218080 या क्रमांकावर संपर्क साधावा.

UTIITSLच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा?

यासाठी तुम्हाला आधी UTIITS च्या ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल

त्यानंतर

https://www.pan.utiitsl.com/PAN _ONLINE/ePANCard. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

यानंतर तुम्हाला तुमचा पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड द्यावा लागेल.

जर ईमेल नोंदणीकृत नसेल तर प्रकल्प अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर आपल्याला पॅन 2.0 अंतर्गत ते अपडेट करावे लागेल.

तुमचा ई-पॅन PDF स्वरूपात नोंदणीकृत ईमेल आयडीवर देखील पाठविला जाईल.

नोंदणीकृत ईमेल आयडीवर तीन रिक्वेस्टपर्यंत ई-पॅन मोफत डिलिव्हर केले जाणार आहे. त्यानंतरच्या रिक्वेस्टसाठी तुम्हाला 8.26 इतका चार्ज द्यावा लागेल. फिजिकल पॅनसाठी रिक्वेस्ट केल्यास तुम्हाला 50 रुपये खर्च करावे लागतात आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *