नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत PMJAY योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली आहे. आर्थिक स्थितीची कोणतीही अट नसल्याने सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि वयोमानाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध असून, आर्थिक स्थितीकडे न पाहता सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.