बँक ऑफ बडोदामध्ये 592 पदांसाठी बंपर भरती
बँक ऑफ बडोदामध्ये 592 पदांसाठी बंपर भरती; अर्ज प्रक्रिया सुरु ! फायनान्स, एमएसएमई, डिजिटल, रिसिप्ट मॅनेजमेंट, आयटी, कॉर्पोरेट लोन अशा विविध क्षेत्रांसाठी ही भरती असून, इच्छुक उमेदवारांना bankofbaroda.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 असून, वयोमर्यादा 22 ते 45 वर्षे आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होईल, व शॉर्टलिस्ट उमेदवारांना बोलावण्यात येईल. अर्ज शुल्कः जनरल/OBC: 600 रु., SC/ST/महिला/PWD: 100 रु. अधिक माहितीसाठी bankofbaroda.in ला भेट द्या.