Wed. Sep 11th, 2024


मुख्यमंत्री लाडकी लेक योजना मिळणार एक लाख रुपये mukhymantri ladaki lek yojana 2024

Lek Ladaki Yojana 2024 Maharashtra – महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत महिलेला प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मिळत आहेत त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री लाडकी लेक  योजना देखील आहे या अंतर्गत प्रत्येक मुलीला एक लाख रुपये मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना आहे. या योजनेबद्दल आधी फक्त घोषणा करण्यात आली होती परंतु ही अशी आता महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी केली आहे. तर लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, फायदे, नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज कुठे मिळेल अर्ज कुठे करायचा असे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लेख संपूर्ण अचूक पद्धतीने वाचा.

लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे (Objectives)
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमण करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
1) मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
2) मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
3) मुलींच्या मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
4) कुपोषण कमी करणे.
5) शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शून्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे.

लेक लाडकी योजना नियम अटी व शर्ती (Lek Ladaki Yojana Terms & Condition)
1) ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एखाद्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
2) या योजनेच्या पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
3) तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
4) दिनांक एक एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
5) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
6) लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
7) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजना कागदपत्रे (Required Documents List)
1) लाभार्थीचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
2) कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) (दाखला एक लाखापेक्षा जास्त नसावा व तहसीलदार चा असावा)
3) लाभार्थीचे आधार कार्ड (Applicant Aadhar Card)
4) पालकाचे आधार कार्ड (Parents Aadhar Card)
5) बँक पासबुक (Bank Passbook)
6) रेशन कार्ड (Ration card) (पिवळे किंवा केसरी)
7) मतदान ओळखपत्र (Voter ID Card) (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास दाखला)
8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)
अर्ज कुठे व कसा करावा (Application Form Fill Up Process)
1) लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता.
3) अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
4) या योजनेसंबंधीत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे.
5) या योजनेसाठी अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या संबंधित अंगणवाडीला भेट द्या व अंगणवाडी सेविका यांना याबद्दलची माहिती विचारा.
6) ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

लेक लाडकी योजनेचे फायदे (Benefits)
1) लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत दिली जाते.
2) ज्याच्यात पात्र असलेल्या मुलींना जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.
3) त्याचबरोबर इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये.
4) मुलगी सहावी गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जातात.
5) तर अकरावीत आठ हजार रुपये एवढा लाभ दिला जातो.
6) तसेच मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते.

अर्ज download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *