Thu. Dec 26th, 2024


राज्य सरकारची भन्नाट योजना! आधारकार्ड दाखवून ‘हे’ कार्ड काढा, १२०९ आजारांवर मिळतील ५ लाखांपर्यंत मोफत उपचार;

केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतून प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक तीन लाख २९ हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थींना दिले असून आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहेत. राज्यात तीन महिन्यात एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढले असून त्यात सोलापूर जिल्हा अव्वल आहेतः…

प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत जनआरोग्य योजना’ आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होणार आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून तीन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत होते.

आता या दोन्ही योजना एकत्र केल्या असून दोन्ही योजना मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे ११ लाख ५९ हजार ३५८ तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ११ लाख ८८ हजार १९७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील एकूण २३ लाख ४७ हजार ५५ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आरोग्य विभागामार्फत दिले जाणार आहे. आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहे.

सर्वच लाभार्थींना मिळणार कार्ड

गेल्या तीन महिन्यात म्हणजेच १३ सप्टेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण ९२ लाख ५९ हजार ७१४ लाभार्थींनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. त्यात सर्वाधिक तीन लाख २९ हजार कार्ड लाभार्थींना काढून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. उर्वरित लाभार्थींनाही काही दिवसांत कार्ड मिळतील, असे नियोजन केले आहे.

– मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

ग्रामपंचायतीतही कार्ड काढण्याची सोय

जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून त्यावर रुग्णाला जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांमध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. लाभार्थींना आपल्या मोबाईलमधूनही कार्ड काढता येते. त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने व योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांच्या मदतीने देखील कार्ड काढता येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *