Tue. Jan 14th, 2025

लाडकी बहीण योजना या सहा गोष्टी घरात असतील तर लाभ मिळणार नाही..

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजने संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी फडणवीस सरकारने तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले असून डिसेंबर महिन्याचे पैसे आता येत्या काही दिवसात जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ दिला जात असून कोट्यावधी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत असे आहे

विशेष बाब अशी की या योजनेअंतर्गत सध्या स्थितीला पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही ही रक्कम 2100 रुपये करू अशी ग्वाही दिली असल्याने येत्या काही महिन्यांनी या योजनेची रक्कम देखील वाढणार आहेत

त्याआधीच मात्र लाडक्या बहिणीची डोकेदुखी वाढणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची फेरफडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या फेर पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. दरम्यान आज आपण लाडकी बहिण योजनेच्या पात्रता जाणून घेणार आहोत. जर तुमच्याकडेही खाली दिलेल्या ६ गोष्टी असतील, तर तुमचा फॉर्म आता रिजेक्ट केला जाणार आहे.

लाडकी बहिण योजनेच्या पात्रता काय असेल

या योजनेचा लाभ हा 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जातोय. पण ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) आहे अशा कुटुंबांना देखील याचा लाभ मिळणार नाही.

ज्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी विभागात कार्यरत असतील, अशा कुटुंबातील महिलांनाही याचा लाभ मिळणार नाही. अशा कुटुंबातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यांचा अर्ज रद्द होईल.

ज्या कुटुंबातील सदस्य आजी-माजी आमदार, खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाहीत

ज्या महिला शासनाच्या इतर योजनांचा म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या कुटुंबातील लोक टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही असे आहे…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *