लाडक्या लेकींच्या खात्यावर ५ हजार ऑनलाईन अर्ज येथे करा
आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणी प्रमाणे लाडक्या लेकीला देखील पैसे मिळतात यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाइन पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
योजनेच्या अंतर्गत कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीनं एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत आंबेगाव तालुक्यात 218, बारामती तालुक्यात 393, दौंड तालुक्यात 216, हवेली तालुक्यात 336, भोर तालुक्यात 67, इंदापूर तालुक्यात 548, जुन्नर तालुक्यात 575, खेड तालुक्यात 258, मावळ तालुक्यात 221, मुळशी तालुक्यात 78, पुरंदर तालुक्यात 240, शिरूर तालुक्यात 242, वेल्हे तालुक्यात 30 तसंच पुणे शहरामध्ये 750 असं मिळून एकूण 4 हजार 172 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हप्ता वर्ग करण्याचं काम सुरु : याबाबत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, ” ‘लेक लाडकी’ या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही पडताळणी झाल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. मुलीच्या जन्मदारात वाढ होणं आणि शिक्षणापासून मुली वंचित राहू नये, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील हप्ता वर्ग करण्याचं काम सुरु आहे.”
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज? : ‘लेक लाडकी’ योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी असून या योजनेसाठी अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता येतो. मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाइन भरला जातो आणि त्यानंतर ऑनलाइन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होते. ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरू करण्यात आली …..