१०वी पास वर रेल्वेत सरकारी नोकरी आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत भारतीय रेल्वेत १४२९८ जागांची मेगा भरती:
भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळ, मुंबई यांनी नुकतीच 14298 रिक्त जागांसाठी भरतीची अधिकृत घोषणा केली आहे.
या भरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. भारतीय रेल्वे भरती मंडळ मार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे. त्या संबंधित अधिक सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ
RRB भरतीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
14,298 रिक्त पदे असणारी मेगा भरती रेल्वे मार्फत करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत (तंत्रज्ञ I, II, III) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवाराकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता १०वी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पत्रता संदर्भात अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वरील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे
अर्जदाराची वयोमर्यादा आणि अर्जाचे शुल्क:
अर्जदार उमेदवाराची वयोमर्यादा तंत्रज्ञ ग्रेड I साठी 18 ते 36 वर्षे तसेच तंत्रज्ञ ग्रेड II साठी 18 ते 33 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५००/- रुपये असून SC, ST, Ex-Serviceman, PWED, Female प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 250/- रुपये आहे.
अर्जाची शेवटची तारीख आणि अधिकृत वेबसाइट:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे असून भरतीची निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणी द्वारे केली जाणार आहे. 2 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच 16 ऑक्टोबर 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. RRB म्हणजेच रेल्वे भरती मंडळ यांची अधिकृत संकेतस्थळ 👇👇