गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना !
केंद्र आणि राज्य सरकार गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबवत आहेत, ज्यांत पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आशा आणि एएनएमच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या योजनेअंतर्गत, महिलांची प्रसूती सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात असली तरी त्यांना लाभ मिळतो. तीन हप्त्यांत दिल्या जाणाऱ्या या मदतीत 1,000 रुपये गर्भधारणेच्या नोंदणीसाठी, 2,000 रुपये सहा महिन्यांनंतर,आणि 2,000 रुपये मुलाच्या जन्माच्या वेळी मिळतात.