घरबसल्या 2 मिनिटात मिळवा ई-पॅन कार्ड
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला घरी बसल्या पॅन कार्ड मी काढता येईल आता सध्या इ पॅन कार्ड काढण्याचा सरकारने सांगितलेला आहे त्याप्रमाणे आपण घरी बसल्या असल्याने पॅन कार्ड कसे काढू शकतो याची माहिती आपण देऊ शकतो.
आधारकार्ड प्रमाणेच पॅनकार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहेत. कोणतेही व्यवहार करताना पॅनकार्ड खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर पैशांचे मोठं मोठे व्यवहार करताना, बँकेतून मोठी रक्कम काढताना, तसेच पैसे गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आले आहे. पॅन अपडेट करण्यासाठी आणि चांगले पॅन देण्यासाठी आयकर विभागाने ही घोषणा केली आहे. यामुळे अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर क्यूआर कोड असलेले ई-पॅन कार्ड मोफत पाठवले जातात.
मात्र, त्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी शुल्क भरावे लागणार आहे. तसेच तुमच्या माहितीसाठी सध्याचे पॅन कार्ड क्यूआर कोडशिवायही वैध राहतील. चला तर मग पॅन 2.0 कसे काढायचे हे जाणून घेऊया..
सर्वप्रथम तुम्ही तुमचेपॅन कार्ड हे PAN NSDL किंवा UTI Infrastructure Technology and Services Ltd. (UTIITSL) ने जारी केले आहे की नाही हे तपासा. ही माहिती तुम्ही पॅन कार्डच्या मागील बाजूस तपासू शकता. त्यानंतर तुम्ही त्यानुसार अर्ज करू शकता..
एनएसडीएलच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा? सर्वप्रथम तुम्हाला एनएसडीएल ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल.
यासाठी तुम्ही
https://www.onlineservices.nsdl. com/paam/requestAnd Downloa dEPAN.htmlया अधिकृत वेब साईटला भेट
द्या.
यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार आणि जन्मतारीख दिलेल्या पर्यायत भरा. यानंतर डिटेल्स चेक करा आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारा.
त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा पॅन 2.0 हा नवीन पॅन कार्ड तयार होईल. पॅन कार्ड जारी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत तीन विनंत्या विनामूल्य केल्या जाऊ शकतात. त्यानंतरच्या विनंतीलासाठी तुम्हाला जीएसटीसह 8.26 रुपये खर्च करावे लागतील. पेमेंट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर ई-पॅन येईल. कोणतीही अडचण आल्यास
tininfo@proteantech.in ईमेल किंवा 020-27218080 या क्रमांकावर संपर्क साधावा.
UTIITSLच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा?
यासाठी तुम्हाला आधी UTIITS च्या ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल
त्यानंतर
https://www.pan.utiitsl.com/PAN _ONLINE/ePANCard. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
यानंतर तुम्हाला तुमचा पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड द्यावा लागेल.
जर ईमेल नोंदणीकृत नसेल तर प्रकल्प अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर आपल्याला पॅन 2.0 अंतर्गत ते अपडेट करावे लागेल.
तुमचा ई-पॅन PDF स्वरूपात नोंदणीकृत ईमेल आयडीवर देखील पाठविला जाईल.
नोंदणीकृत ईमेल आयडीवर तीन रिक्वेस्टपर्यंत ई-पॅन मोफत डिलिव्हर केले जाणार आहे. त्यानंतरच्या रिक्वेस्टसाठी तुम्हाला 8.26 इतका चार्ज द्यावा लागेल. फिजिकल पॅनसाठी रिक्वेस्ट केल्यास तुम्हाला 50 रुपये खर्च करावे लागतात आहे