Sun. Sep 15th, 2024

ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना या तारखेला पैसे मिळणार mukhymanrti ladaki bahin yojana new update 2024

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात पैसे येणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांना कधी मिळणार आहेत त्याचप्रमाणे त्यांनी काय केले पाहिजे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत. तर महिलांच्या उर्वरित अर्जाची छाननी चालू आहे. दरम्यान, या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत. पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. काही महिलांना कागदपत्रांची अडचणी येत आहे. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे? असे विचारले जात आहे.

महिलांना मिळणार 4500 रुपये

आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.

या बहिणींना पुढील आठवड्यात पैसे मिळणार’

लाडकी बहीण योजनेचे पैसे राखीच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जमा झाले. लाडक्या बहिणी योजना अंतर्गत ज्या माझ्या बहिणींना पैसे आले नाहीत अशा बहिणींना पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये हे पुन्हा स्पष्ट केले. तसेच लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही. याउलट मासिक लाभात वेळोवेळी वाढ केली जाईल, असे ते म्हणाले..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *