तुम्हाला मिळतील 10हजार आनंदाची बातमी! आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
शिष्यवृत्ती बद्दल:
केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने १९९५पासून महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप सुरू केली आहे . ही शिष्यवृत्ती अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिली जाते, जे विद्यार्थी डिप्लोमा कोर्स करू इच्छितात असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात .ही शिष्यवृत्ती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
● शिष्यवृत्तीची रक्कम:- रु. १०,०००/- प्रतिवर्ष
● पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी ६०% पेक्षा जास्त गुणांसह १०वी किंवा १२वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि कोणत्याही डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) केवळ कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील उमेदवारच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) शिष्यवृत्तीसाठी फक्त प्रथम वर्षाचे डिप्लोमा विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे..
● आवश्यक कागदपत्रे :-
१) ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे त्या महाविद्यालयातील प्रवेशाचा पुरावा. ( उदा: ऍडमिशन लेटर , अलॉटमेंट लेटर, फी रिसिप्ट, बोनाफाईड सर्टिफिकेट )
2) दोन पैकी कोणत्याही एका रेफरन्सचे टेस्टिमोनिअल ( रेकमेंडेशन लेटर ) (शिफारस पत्र) ( शिक्षण किंवा एम्प्लॉयर यांपैकी कोणीही रेफरन्स लेटर देऊ शकतात.)
3) तुमची सामान्य योग्यता आणि स्वारस्य, तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि तुमच्या जीवनातील महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा याबद्दल एक छोटासा निबंध.
4) आधार कार्ड
५) इयत्ता १०वी च्या मार्कशीटची प्रत.
६) इयत्ता १२वी च्या मार्कशीटची प्रत. ( जर इयत्ता १२वी परीक्षा देऊन नंतर डिप्लोमा करीत प्रवेश घेतला असेल तर )
7) कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्राची प्रत किंवा उत्पन्नाचा पुरावा
8) पासबुकच्या पहिल्या पानाची किंवा रद्द केलेल्या चेकची प्रत
( कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे यादीत नमूद केल्यानुसार कागदपत्रांचे नाव बदलून कागदपत्रे अपलोड करावे, अधिक माहिती करीत खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.)
● आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-
https://www.kcmet.org/IMAGES/legal-certificates/List-of-documents-for-MAITS.pdf
● ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: –
https://maitsscholarship.kcmet.org/
● संपर्क तपशील:-
पत्ता:
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट
सेसिल कोर्ट, रीगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४०००१
ई – मेल आयडी:
maits@mahindra.com..
● टीप:-
1) शिष्यवृत्तीसाठी मुलींना, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील मुले, अपंग विदयार्थी आणि सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.
2) पहिले वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाही आहे
3) जे विद्यार्थी डिग्री अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत किंवा डिप्लोमा व्यतिरिक्त कोणत्याही अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत ते देखील या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.