दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी ssc HSC board exam
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२३ मध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकण्याची सोय राहणार आहे. विद्यार्थ्यांना नववीपासूनच आपल्या भविष्याची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीनंतर आता इयत्ता नववीलाही महत्त्व आले ….
वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेवून भविष्य घडविण्याबाबत विद्यार्थी अनेकदा तणावाखाली असतात. त्यामुळे विद्यार्थी महागडे कोचिंग क्लासेस लावतात. त्यात नापास झाले तर अनेकवेळा टोकाचे पाऊलही उचलतात. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय ‘फ्रेमवर्क’नुसार परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे, की विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे आहे हे स्वतः ठरवता येईल. दहावीपर्यंत विविध विषयांचा तपशीलवार अभ्यास करून जाणून घेतल्यावर त्याला अकरावीत तीन पर्याय मिळतील.
पहिल्या पर्यायात मानवता, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि संगणक हे विषय असतील. दुसऱ्या पर्यायात आंतरविद्याशाखीय क्षेत्र असेल, ज्यांना पदवीनंतर संशोधन क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय असेल. तर तिसऱ्या श्रेणीत लेखक, क्रीडा आणि व्यावसायिक हे विषय निवडण्याचा पर्याय असणार आहे..
इयत्ता दहावी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नववी, दहावी या दोन वर्षात एकूण आठ अभ्यासक्रमांपैकी प्रत्येकी दोन आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो. परंतू, नव्या नियमांमध्ये आठ विषय देण्यात आले आहेत. यामध्ये मानवता, गणित, संगणक, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषय आहेत.
अभ्यासक्रम विषयांचे वर्गीकरण
मानवता : भाषा, साहित्य, तत्वज्ञान
समाजशास्त्र : इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र
विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
गणित आणि संगणक : गणित, संगणक विज्ञान, व्यवसाय गणित
व्यावसायिक कौशल्य विकास : संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला
क्रीडा : खेळ, योगा
आंतरविद्याशाखा : वाणिज्य, आरोग्य, माध्यम, समुदाय विज्ञान, भारताचे ज्ञान, कायदेशीर अभ्यास
अकरावी, बारावीत विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य लक्षात घेऊन विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकता येतील. त्यासाठी विद्यार्थ्याला आता नववीपासूनच भविष्याची तयारी सुरू करावी लागेल. त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला सर्व विषय शिकवले जातील, जेणेकरुन बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा याचा गोंधळ होणार नाही,
– रुपेश मोरे, शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation