बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 हजारांचा बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज (मंगळवार) जमा होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी बोनस जाहीर करण्यात आला होता, पण रक्कम देण्यात आली नव्हती. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी गुडन्यूज आहे. पालिकेकडून बोनसची 80 कोटींची रक्कम मिळून देखील निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव बोनसचे वितरण रखडले होते.
बोनस खात्यात जमा होणार !