Wed. Dec 4th, 2024

भारतीय खाद्य निगममध्ये भरती पगार ८०हजार रुपये

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

Food Corporation Of India Bharti 2024 : भारतीय खाद्य निगममध्ये भरती निघाली असून या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या भरती मोहिमेत एकूण ६ पदांवर भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी भारतातील विविध राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे.

रिक्त पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवाराला ८०,००० रुपये पगार मिळणार
शैक्षणिक पात्रता : उमेदवार केंद्र/राज्य सरकार/पीएसयूमधून निवृत्त झालेला असावा आणि मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीची किमान शैक्षणिक पात्रता असावी.

वयोमर्यादा : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६८ वर्ष असावी.
निवड पद्धत : या नोकरीसाठी अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उमेदवारांना अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, भारतीय खाद्य निगम, बाराखंभा, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ : fcivlts.in

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *