महिलांसाठी आनंदाची बातमी मिळणार 50हजार! आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी काय करावे लागणार याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 236
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संरक्षण अधिकारी, गट ब 02
शैक्षणिक पात्रता : i) सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील. ii) समाज कार्य विषयासंबधीत किमान तीन वर्षाचा अनुभव
2) परिविक्षा अधिकारी, गट क 72
शैक्षणिक पात्रता : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
3) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क 01
शैक्षणिक पात्रता : i) माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील
4) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क 02
शैक्षणिक पात्रता : i) माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क 56
शैक्षणिक पात्रता : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
6) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क 57
शैक्षणिक पात्रता : सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
7) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड 04
शैक्षणिक पात्रता : i) माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii)उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
8) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड 36
शैक्षणिक पात्रता : i) माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
9) स्वयंपाकी गट-ड 06
शैक्षणिक पात्रता : i) माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 नोव्हेंबर 2024 रोजी, किमान 18 ते कमाल 43 वर्ष (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग : 1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग : 900 (10% सूट )
इतका पगार मिळेल :
संरक्षण अधिकारी, गट ब – 38,600/- ते 1,22,800/-
परिविक्षा अधिकारी, गट क – 38,600/- ते 1,22,800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क – 44,900/- ते 1,42,400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क- 41,800/- ते 1,32,300/-
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क- 25,500/- 81,100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क – 19,900/- ते 63,200/-
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड – 16,600/- ते 52,400/-
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड – 15,000/- ते 47,600/-
स्वयंपाकी गट-ड -16,600/- ते 52,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.wcdcommpune.com/