Thu. Oct 17th, 2024

या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार पाहा पूर्ण प्रोसेस ..

Mukhymantri Ladki Bahin Yojana: आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार यासाठी आपण काय करावे अर्ज कसा भरायचा व त्यांच्या साठी काय करावे लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
चौथ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात थेट 5500 जमा होणार आहेत.आता हे पैसै कसे खात्यात येणार आहेत? हे जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कसे तपासायचे, हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेल आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *