Tue. Dec 17th, 2024

लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हप्ता उद्या मिळणार यादीत तुमचे नाव पहा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ..

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी, यासंदर्भात राज्यातील २ कोटी ५० लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे…

या पार्श्वभूमीवर ‘लाडक्या बहिणीं’ना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात ….

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी (१५ ऑक्टोबरपर्यंत) राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती.

त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही आहे

त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार, यासंदर्भात योजनेंतर्गत राज्यातील जवळपास २ कोटी ५० लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध योजनांसोबतच ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता असते

तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम !

विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि यासंदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील ‘लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे

लाडकी बहीण योजनेच्या मानधानात वाढ केली जाणार आहे. यासंदर्भात तरतूद करण्यात यावी, अशी सूचना मी केली आहे, असे शिंदे गटातील नेत्या निलम गोहे यांनी सांगितले आहे. त्यामुळे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र यामध्ये वाढ करुन हे मानधन 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते आहे

अर्ज नोंदणीचाही निर्णय होणार?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून, लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गेल्या १४ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही, यासंदर्भातील निर्णयही विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची अपेक्षा आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *