राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या संदर्भात एक जुलैपासून राज्यातील सर्व महिला फॉर्म भरत आहेत त्यासाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी पारनेरमध्ये लाडक्या बहिणींना संबोधन केले. यावेळी ते म्हणाले, की ‘लाडकी बहीण योजनेत वर्षाला 18 हजार रुपये आम्ही देणार आहोत. तसेच, वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील. वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात सरकार जमा करणार आहे. हा चुनावी जुमला नाही. जनतेसाठी आहे’. दरम्यान, लाडकी बहिण योजनेद्वारे पात्र महिलांना महिना 1500 रुपये मिळणार आहेत. ऑगस्टमध्ये पहिल्या हफ्त्यात एकसाथ दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत.