लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी करावे लागणार हे काम Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary Free Lpg
आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याला दीड हजार मिळणार आहे त्याचप्रमाणे तीन मोफत गॅस सिलेंडर कसे मिळतील याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
Yojana Beneficiary: महाराष्ट्र सरकारच्या
Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin (Mukhyamantri Annapurna Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी (Pm Ujjwala Yojana) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबाना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे. आणी लवकरात लवकर (e-kyc) ई-केवायसी करावी लागणार आहे.
एच.पी. पे. अॅपवरून तुम्ही दोन मिनिटात सेल्फ ई- केवायसी करू शकता. ई-केवायसी करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशिअल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते. ई-केवायसी केल्यानंतर ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाइन बुकिंग करावे.
त्यानंतर लाभार्थ्यांकडून तीन सिलिंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल. ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडरची खरेदी केल्यावर तीन सिलिंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येतील. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन ई-केवायसी करण्यास असमर्थ असाल तर तुमच्या गॅस एजन्सीशी त्वरित संपर्क साधावा लागतो