Tue. Dec 17th, 2024

लाडक्या बहिणींना महिन्याला ८हजार मिळणार ऑनलाईन लिंक

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

vima Sakhi Scheme : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिलावर्गात प्रचंड लोकप्रिय झाली. या योजनेतून महिलांना थोडा का होईना पण थेट आर्थिक लाभ मिळाला. या योजनेच्या जोरावर भाजप महायुती सरकारने जोरदार विजय संपादन केला. या विधानसभान निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहेत

महायुती सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीपूर्वी महायुतीने या पैशांत वाढ करत 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अंमलबजावणी आधीच केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली असून एक धमाकेदार योजना आणली आह…

विमा सखी योजना आली..फायदाच फायदा
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या योजनेचे नाव विमा सखी योजना हे आहे. आता या माध्यमातून सुद्धा महिलांना रोजगार मिळण्याची मोठी संधी असणार आहे. आता ही योजना नेमकी काय आहे, त्यात काय लाभ मिळणार तसेच यासाठी पात्रता काय असणार?, त्याबाबत जाणून घेऊयात सविस्तर

एलआयकडून अमलात येणार ही योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी या विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे.

काय काय आहे या योजनेत? अन् पात्रताही
या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
महिलेचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असायला हवे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल.
या काळात महिलांना स्टायपेंडही मिळेल.
तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याचीही संधी दिली जाईल.
असे दिल जाईल महिलांना मानधन
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7 हजार रुपये मिळतील.
दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6 हजार केली जाईल.
तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5000 रुपये होईल.
महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमीशनही दिले जाईल.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल.
त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *