लाडक्या बहिणींनो आतच मोबाईल चेक करा; फक्त ‘या’ महिलांच्या खात्यावर आले पैसे
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना याचा फायदा होत आहे राज्यातील प्रत्येक महिलाला महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतात आता आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे त्याचीच माहिती आपण घेणार आहोत
लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेनेच महायुतील पुन्हा सत्तेवर बसविले. निवडणूक काळात लाडक्या बहिणींचा हप्ता हा दीड हजारांवरुन २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.
याच लाडकी बहिण योजनेबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात
ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले होते व ज्यांना अद्याप एकही हप्ता आलेला नाही, अशा महिलांच्या खात्यावर शुक्रवारपासून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेता काही महिलांना फक्त एक-दोन हप्ताचे पैसे मिळाले होते, मात्र बाकीचे पैसे मिळालेले नव्हते. त्या महिलांच्या खात्यातही आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी ४० लाख महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यातील ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते, त्या महिलांना पैसे देण्यास सुरुवात झाली आहे.
2100 रुपये कधीपासून मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. विरोधकांनीही महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिलांनी महाविकास आघाडी सरकारला सपशेल नाकारले. आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता २१०० रुपये देणार की, थेट नव्या वर्षात २१०० रुपये देणार, हे मात्र अजून ठरलेले नाही. कदाचित नव्या वर्षात वाढीव २१०० रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पहिल्या अर्थसंकल्पात यावर तरतूद करुन त्यानंतरही २१०० रुपये मिळतील, असेही काहींचे म्हणणे आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी वाट पहावी लागेल.
लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी ladaki bahin yojana new update 2024. 👇👇
डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?
डिसेंबरच्या हफ्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे. आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ताही लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र लाडक्या बहिणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्याचे आर्थिक सोर्स तपासावे लागतील, असे सांगितले आहे. त्यामुळे कदाचित डिसेंबरचा हप्ता हा पहिल्याप्रमाणेच म्हणजे दीड हजार रुपयेच मिळेल…. असे जाणकारांचे म्हणणे आहे…