Thu. Dec 12th, 2024

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अर्ज छाननी होणार नाही सर्वांना पैसे मिळणार…

महाराष्ट्रात लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर महायुतीचे सरकार आले माहितीचे सरकार आल्यानंतर राज्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची परत छाननी होणार अशा प्रकारचे वृत्त येत होते यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे मंत्री आदित तटकरे यांनी दिलेले आहे अर्ज छाननी करण्याचा सरकारचा विचार नाही’

लाडक्या बहिण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची छाननी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. पण अशी कोणतीही छाननी करण्यात येणार नसल्याचे आदिती तटकरेंनी म्हटले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरु असलेली चर्चा चुकीची आहे

. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवली. सर्व पडताळणी करुनच लाभार्थी महिलांचा योजनेत समावेश केला, असे त्या म्हणाल्या..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *