Thu. Nov 21st, 2024

विद्यार्थांना दिवाळी बोनस 5हजार आतच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे विद्यार्थांना
5हजार मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ जाहीर झाल्यानंतर त्यासंबंधीचे पोर्टलही सुरू करण्यात आले. इंटर्नशिप योजनेचे पोर्टल सुरू झाल्यानंतर 24 तासांत नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या 1 लाख 55 हजार 109 झाली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर करून घ्या. बारावीनंतर ऑनलाइन किंवा डिस्टन्स एज्युकेशन घेणारे विद्यार्थी इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. याअंतर्गत दरमहिन्याला पाच हजार मिळतील.

पीएम इंटर्नशिप स्कीम 2024 साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 12 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. नोंदणी लिंक संध्याकाळी 5 वाजल्यापासून सक्रिय झाली आहे, उमेदवार अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात. ही योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. या योजनेअंतर्गत इंटर्नशिप करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने 25 ऑक्टोबरपूर्वी अर्ज करावा.

हायस्कूल, उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण विद्यार्थी या इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय ITI पास, पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक, BA, B.Sc., B.Com, BCA, BBA आणि BPharm मधून पदवी घेतलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात, परंतु पोस्ट ग्रॅज्युएट, IIT पदवीधर, NIT, IIM, राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटी पदवीधर, एमबीए, सीएस, सीए, एमबीबीएस आणि बीडीएस पदवी असलेल्या उमेदवारांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. लक्षात ठेवा की अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

कसा करू शकतो अर्ज ?

सर्वप्रथम, तुम्हाला पीएम इंटर्नशिप स्कीम pminternship.mca.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर रजिस्टर लिंकवर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
तुम्हाला तेथे नोंदणीचे तपशील भरावे लागतील आणि नंतर सबमिट वर क्लिक करा.
आता उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोर्टलद्वारे बायोडेटा तयार केला जाईल.
त्यानंतर तुम्हाला स्थान, क्षेत्र, कार्यात्मक भूमिका आणि पात्रता यावर आधारित जास्तीत जास्त पाच इंटर्नशिप संधींसाठी अर्ज करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करावे लागेल.
शेवटी, भविष्यातील वापरासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

किती असेल इंटर्नशिपचा कालावधी?
या योजनेअंतर्गत, उमेदवार 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप करू शकतील. पाच वर्षांत एक कोटी उमेदवारांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाईल. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्राने शीर्ष कंपन्यांमध्ये 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इंटर्नशिप दरम्यान, उमेदवाराला दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड म्हणून दिले जाणार आहेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *