Fri. Nov 22nd, 2024


SSC HSC board ! दहावी बारावी बोर्ड परीक्षेत मोठे बदल .

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये आता विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याची पद्धत वापरली जाणार आहे. या पद्धतीचा वापर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून केला जाणार असून, या पद्धतीमुळे परीक्षेमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना चाप लावणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील नऊ विभागीय मंडळांद्वारे दहावी, बारावीची लेखी परीक्षा एकाच वेळी घेण्यात येते.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

यात पुणे वगळता अन्य विभागांत शहरी भागात आणि ग्रामीण भागात एकाच गावात दोन किंवा दोनपेक्षा अधिक परीक्षा केंद्रे असल्यास या केंद्रांवरील विद्यार्थी सरमिसळ करून विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षा केंद्रावर बसविले जाते. त्यामुळे गैरप्रकार रोखणे शक्य होते. पुणे विभागातही पूर्वी ही ‘सरमिसळ’ पद्धत राबविण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव गेल्या सहा-सात वर्षांपासून ही पद्धत बंद झाली होती. आता ही पद्धत पुन्हा लागू करण्याबाबत पुणे विभागीय मंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य मंडळाने मान्यता दिली तसेच त्यानुषंगाने काही सूचनाही दिल्या आहेत…

असे असेल नियोजन
■ तालुका आणि मोठ्या शहरांत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येईल.
■ दोन किंवा जास्त केंद्र असलेल्या ठिकाणीच ही पद्धत असेल.
■ प्रत्येक केंद्रावरची विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेची क्षमता लक्षात घेऊन अंमलबजावणी
■सरमिसळ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार नाही, याची खबदारीही घ्यावी लागणार
■ विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत प्रवेशपत्रावर परीक्षा स्थळाची नोंद अचूक करावी लागणार आहे.  

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *