मुलाच्या नर्सरी प्रवेशासाठी आता या वर्षे वयाची अट!
पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम ‘एनईपी-२०२०’च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. ‘एनईपी’नुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे. नर्सरीसाठी ३ वर्षांची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील, तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने धोरण तयार करण्यात येत आहेत..
हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्ट केले. तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे.
दरम्यान, लहान मुले रात्री उशिरापर्यंत (साधारणत: अकरा वाजेपर्यंत) झोपत नाहीत. त्यानंतर सकाळी सात वाजता शाळेत पोचण्यासाठी त्याला सहा- साडेसहा वाजता उठविले जाते. त्यामुळे त्याला सात तासांपर्यंतच झोप मिळते आणि त्याचा थकवा शाळेत जाणवतो. अशा मुलांमध्ये चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी नऊनंतर असणार आहेत, अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
‘प्राथमिक शिक्षण’कडून प्रस्तावाची तयारी
चिमुकल्यांची शाळा सकाळी सात ते साडेसात वाजता भरत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर विपरीत परिणाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सर्वच शाळा सकाळी नऊनंतरच भरतील, असा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण खात्याकडून तयार केला जात आहे. त्याला मान्यता घेऊन प्रस्तावानुसार त्याची अंमलबजावणी २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षापासून होईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुढच्या वर्षी ‘एक राज्य एक गणवेश’
राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे. मुलांमध्ये वेगळेपणाची भावना नको हाही त्यामागील उद्देश आहे. या नवीन बदलाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहेत.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation