Sat. Jan 4th, 2025 4:07:01 PM

या जिल्ह्यातील शाळा कायमच्या बंद होणार शासनाचा मोठा निर्णय..

: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत शाळा, बोगस शाळा सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारून त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आरटीई 2009 च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करुन त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुणे जिल्ह्यातही 13 शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले होते. त्यावरही कारवाई करण्यात आली होती. मात्र आता पुण्यातील आणखी 16 इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत…
पुणे जिल्ह्यातील किमान 16 इंग्रजी माध्यमांच्या शाळा पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE) डेटानुसार 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळा मुख्यत्वे खाजगी, विनाअनुदानित असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या शून्य पटसंख्येमुळे त्या बंद करण्यात आल्या आहेत.
दौंड, पिंपरी, आकुर्डी, औंध, हवेली, मुळशी, हडपसर, वेल्हे आदी भागांसह शहर आणि ग्रामीण भागात या शाळा पसरल्या आहेत. बहुतेक शाळा स्वयं-अर्थसहाय्य तत्त्वावर चालवल्या जात होत्या. तसेच त्या खाजगी, विनाअनुदानित शाळा आहेत. 2022-23 आणि 2023-24 शैक्षणिक वर्षांच्या नोंदी कमी पटसंख्येवर आधारित या शाळांचा विचार करण्यात आला होती.

“शून्य पट असलेल्या शाळा कमी करण्यात येणार आहेत. ज्या शाळा पोर्टलवर शून्य पटाच्या दिसत आहेत तिथे विद्यार्थ्यीच नाहीत. म्हणून त्या शाळा कमी करण्यात येत आहे,” अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहेर यांनी दिली.
बंद केलेल्या शाळांची नावं
पुणे जिल्ह्यातील शून्य पटाच्या शाळांची यादी
1) पी. जोग स्कूल, बिबवेवाडी
2) गोरा कुंभार हायस्कूल, औंध
3) कै. पी. बी. जोग हायस्कूल मराठी मीडियम, औंध
4) हसन हुसैन इमामिया उर्दू हायस्कूल, हडपसर
5) बाबुराव दामले माध्यमिक विद्यालय, मुळशी
6) जी. जी. इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
7) डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली, आकुर्डी
8) संकपाळ इंटरनॅशनल स्कूल, हवेली
9) राहुल इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
10) पलांडे जुनिअर कॉलेज, शिरूर
11) अमृतेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, वेल्हे
12) महात्मा फुले जुनिअर कॉलेज, औंध
13) गणेश इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
13) दी काकस इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
14) विश्व कल्याण इंग्लिश मीडियम, आकुर्डी
15) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी
16) एस. सी. ॲण्ड नवबौद्ध बॉइज रेसिडेन्शियल स्कूल, दौंड

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *