Fri. Oct 18th, 2024

लाडकी बहीण योजना बंद 2024 Mazi Ladki Bahin Yojana 2024

Mazi Ladki Bahin Yojana : महारष्ट्र राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला भरघोस प्रतिसादत मिळत आहे. राज्यभरात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठा अर्ज दाखल केले आहेत. लवकरच या योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. तसेच महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन केले आहे. आता अजित पवारांनीच लाडकी बहीण योजना बंद पडेल असे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी असं वक्तव्य का केले जाणून घेऊ.

एवढी चांगली लाडकी बहीण योजना आणली तरी विरोधक टिका करतात असे म्हणत उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेवर टिका करणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. बहीणींनो हा दादाचा वादा आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली. मी असेपर्यंत योजना बंद पडु देणार नाही. पण बहिणींनो आपल्या सरकारने योजना सुरु केली.आता तुमचीपण जबाबदारी आहेत

विधानसभेला तेवढं लक्षात ठेवा अन्यथा ही योजना बंद पडेल असेही सांगायला ते विसरले नाहीत. बजेटमधील सर्वात महत्वाची ही योजना असुन, अडीच कोटीपेक्षा जास्त महीलांना या योजनेचा लाभ होईल असे अजित पवार म्हणाले. 105 लाख महीलांनी लखपती योजनेचा लाभ घेतला. यापुढे मुलींना शासन 100 टक्के मोफत शिक्षण देणार,शेतकर्‍यांना मोफत विज देणार असल्याचेही अजित पवार म्हणाले

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याचं, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे.

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *