Thu. Oct 17th, 2024

नवऱ्याच्या नावाने कनेक्शन असले तरी मोफत 3 गॅस मिळणार फक्त हा फॉर्म भरा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे, असा नियम होता. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. आता नवऱ्याच्या नावावर गॅस कनेक्शन असलं तरीही लाडक्या बहीणीला अन्नपर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे..वर्षाला 3 मोफत गॅस मिळणार आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुटुंबाची भेट या कार्यक्रमात एका घरी दिली. आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *