लाडकी बहीण योजनाः दिवाळी बोनस 5500
राज्य सरकारने “माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक पात्र महिलेला 5500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांच्या एकत्रित 3000 रुपयांबरोबर दिवाळी बोनस म्हणून अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. महिलांना ऑक्टोबर महिन्याच्या रक्कमेसह दिवाळी बोनस मिळण्याची अपेक्षा होती. यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे दिवाळी साजरी करण्यासाठी महिलांना आर्थिक आधार मिळेल.