Thu. Dec 12th, 2024

लाडक्या लेकींच्या खात्यावर ५ हजार जमा होणार आताच अर्ज करा

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळं महायुतीला निवडणुकीत यश मिळवता आलं. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिणी’ योजनेचा पुण्यातील 21 लाख ‘लाडक्या बहिणीं’ना लाभ मिळाला आहे. आता 4 हजार ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 5 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1 हजार रुपये या योजनेच्या आधारे मिळणार आहेत.

लाभ कोणाला मिळणार? : राज्य सरकारनं ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना बंद करून ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. या योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्यानं त्यातील एक किंवा दोन मुलीची अट रद्द करून ‘लेक लाडकी’ योजनेत एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरीही मुलीला योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं. तसंच एक लाख उत्पन्न असलेल्या आणि पिवळ्या, केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार : ‘लेक लाडकी’ योजनेच्या आधारे पुण्यात पहिल्या टप्प्यात 4 हजार 172 मुलींना पहिल्या टप्प्यातील 5 हजार रुपये वर्ग करण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे. 1 किंवा 2 दिवसांत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर 5 हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात येणार आहे. यात पुणे शहरातील 750 लाभार्थ्यांना, तर ग्रामीण भागात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील 575 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देऊन लाभार्थी मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज? : ‘लेक लाडकी’ योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी असून या योजनेसाठी अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता येतो. मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाइन भरला जातो आणि त्यानंतर ऑनलाइन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होते. ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरू करण्यात आली….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *