लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता उद्या जमा ऑनलाईन यादी जाहीर तुमचे नाव पहा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळालेला नाही.
त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या दिवसांत डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना पुढील उद्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अजित पवार यांची भेट घेतली असून पुढील दोन दिवसांत 1500 रुपये खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनासंदर्भात चर्चेला उधाण आलं आहे.
ला बहीण योजना बंद होणार का?
लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा वावड्या उठवल्या जात आहे. मात्र, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्ष काँग्रेस चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असेल, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले आहे
पात्रता आणि निकषांत बदल नाही…
लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या विविध चर्चा सुरू आहेत. लाभार्थी महिलांच्या घरी जाऊस सर्व्हेक्षण होणार, योजनेचे निकष आणि पात्रता बदलणार, असे बोलले जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, या केवळ अफवा आहेत, असे देखील मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहेत
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे तपशील
राज्यात प्राप्त झालेले अर्ज – सुमारे 2.6 कोटी
एकूण मंजूर लाभार्थ्यांची संख्या: 2.5 कोटी
आधार सीडिंगसाठीअर्ज प्रलंबित – 16 लाख
पैसे मिळालेल्या लाभार्थींची अंतिम संख्या – 2.3 कोटी
मतदानाआधी वितरित करण्यात आलेली रक्कम – रु. 17,000 कोटी
छाननी बाकी असलेले कागदपत्रे – 2.5 लाख (एकूण लाभार्थ्यांच्या 1 टक्के)