Thu. Nov 21st, 2024

Cotton Soyabean Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे 05 हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा 1का मिनटात तुमच्या मोबाईलवर.

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला अनुदान मिळाले आहे की नाही याबाबत अधिक माहिती आपण घेणार आहोत गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे. येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टलचे अनावरण झाले.

गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.

कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही ऑनलाईन कशी चेक कराल? १) पुढील अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा. https://scagridbt.mahait.org२) सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती लाल चौकोनात Disbursement Status वर क्लिक करा. ३) पुढे गेल्यावर Disbursement Status पेज दिसेल त्यात तूंच आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करा. ४) त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळते

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *