Tue. Dec 17th, 2024

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो मिळालेले पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवा; महिन्याला ८हजार मिळतील

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेद्वारे मिळालेले पैसे कसे गुंतवायचे याचा तुम्हाला प्रश्न पडलाय का? तर आज अशा महिलांना आम्ही चांगली कल्पना देणार आहोत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र हे मिळालेले पैसे कसे गुंतवायचे याचा तुम्हाला प्रश्न पडलाय का?

तर आज अशा महिलांना आम्ही चांगली कल्पना देणार आहोत. यामध्ये तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये हे पैसे गुंतवू शकतात

गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडाचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये गुंतवणुकीचे काय फायदे आहेत आणि त्यात गुंतवणूक कशी सुरू करू शकता हे जाणून घेउ शकता

सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे. जरी जुन्या काळात फक्त भौतिक पद्धतीने सोन्याची खरेदी करणं हा पर्याय होता. मात्र आजच्या काळात डिजिटल पद्धतीने देखील सोन्याची खरेदी करण्यात येते. सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे गोल्ड ईटीएफ आहे

गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडाचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफ हे शेअर्स प्रमाणे BSE आणि NSE वर खरेदी आणि विक्री करता येते. यामध्ये तुम्हाला भौतिक पद्धतीने सोनं मिळत नाही. जेव्हा तुम्ही ते विकता तेव्हा तुम्हाला त्यावेळच्या सोन्याच्या किमतीएवढे पैसे मिळतात.

गोल्ड ईटीएफचे फायदे

भौतिक सोन्यापेक्षा यामध्ये गुंतवणूक करणं सोपं आहे कारण ईटीएफ युनिट्समध्ये खरेदी केले जातात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोने. तुमच्याकडे जास्त पैसे नसल्यास, तुम्ही एक किंवा दोन युनिट सोने खरेदी करू शकता.

भौतिक सोने खरेदी करताना, जर तुम्ही अगदी लहान अंगठी खरेदी केली तर तिचे वजन किमान 4 ते 5 ग्रॅम असतं. मात्र गोल्ड ईटीएफ कमी किमतीतही खरेदी करता येतो. याशिवाय यामध्ये एसआयपीद्वारे खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *