Fri. Nov 22nd, 2024

Sarthi Exam : सारथीची पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलली

पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानूसार १७ ऐवजी २४ डिसेंबरला सारथी, बार्टी व महाज्योती पीएचडी फेलोशीप संयुक्त सीईटी परीक्षा पार पडणार असल्याचे आहे…

राज्यभरातील मराठा किंवा कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. पात्र विद्यार्थ्यांची निवड मागील वर्षापर्यंत मुलाखत घेऊन गुणवत्तेच्या आधारे प्रदान करण्यात येत होती. परंतु, राज्य सरकारने छात्रवृत्तीच्या संख्येवर मर्यादा आणली. त्यामुळे आता सामाईक परीक्षेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रविवारी (ता.१७) एकाच दिवशी सारथीच्या पात्रता परीक्षेबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ची देखील परीक्षा होती. त्यामुळे ही पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधीचे वृत्तही ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. अखेर परीक्षा पुढे ढकलल्याचे परीपत्रक सारथीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाला यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

परीपत्रकात सारथी म्हणते, ‘‘राज्यातील पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ डिसेंबरला एमपीएससी बरोबरच इतरही परीक्षा असल्याने परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. त्यामुळे संयुक्त पात्रता परीक्षा १७ ऐवजी २४ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात यावी.’’ लवकरच विद्यार्थ्यांना यासंबंधीचे परीक्षा प्रवेश पत्रही पाठविण्यात येणार आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *