Thu. Dec 26th, 2024


Schools : राज्यातील ६६१ अनधिकृत शाळांपैकी ७८ शाळा बंद

राज्यात सद्य:स्थितीत खासगी व्यवस्थापनाद्वारे ६६१ शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत शाळांपैकी ७८ शाळा बंद करून त्यातील तब्बल सहा हजार ३०८ विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे

राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवर केलेल्या कार्यवाहीबाबत विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना केसरकर यांनीही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘अनधिकृत शाळा बंद करण्याची कार्यवाही, फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच दंड आकारण्याची कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे…

६६१ अनधिकृत शाळांपैकी ७८ शाळा बंद करून त्या शाळांमधील सहा हजार ३०८ विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका परिक्षेत्रातील एकूण १८६ अनधिकृत शाळांपैकी १४ शाळा बंद केल्या असून उर्वरित १७२ शाळांबाबतची तपासणी सुरू आहेत.’

राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने अनियमिततेबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना १६ जून रोजी कारणे दाखवा नोटीस, तर संबंधित शिक्षणाधिकारी यांना २० जुलै रोजी ज्ञापन बजावण्यात आले आहे, असेही केसरकर यांनी उत्तरात स्पष्ट केले आहेत…

तसेच, २०१२ पूर्वीच्या अनेक शाळा, संस्थांकडून स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२ यातील तरतुदींमध्ये शिथिलता देऊन शाळा नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ही बाब विचाराधीन असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *