Supreme Court Jobs 10वी पासवर सुप्रीम कोर्टात नोकरी
Supreme Court Jobs: सर्वोच्च न्यायालयात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरी करण्याची संधी चालू आलीय. कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी भरती केली जाणार आहे.
सुप्रीम कोर्टात नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट अटेंडंटच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. आता तुम्ही विचारात असला सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी तर या पदासाठी उच्च शिक्षणाची गरज असेन. परंतु या नोकरीसाठी उमेदवार फक्त १०वी पास असला पाहिजे. दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या sci.gov.in या वेबसाइटला भेट देऊन यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी 23 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय परिचर पदाच्या 80 रिक्त पदांवर भरती होणार आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल / ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 400 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
- तर, एससी/एसटी/ पीडब्ल्यूडी/ईएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल. ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी लेखी परीक्षा होईल. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल. तसेच प्रात्यक्षिक ट्रेड स्किल टेस्ट आणि मुलाखतही होणार आहे.
लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. ज्यामध्ये ३० गुणांचे सामान्य ज्ञान आणि ७० गुणांचे कुकिंग संबंधित प्रश्न असतील. तर प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट 70 गुणांची असेल आणि मुलाखत 30 गुणांची असेल. तर परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये आहे. तर SC, ST आणि दिव्यांगांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये असेल. उमेदवारांना स्तर-3 नुसार वेतन दिले जाईल. उमेदवारांना दरमहा 21700 ते 46210 रुपये मिळतील.