TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारीत; पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजन.
TET Exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाइन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ यापुढे ऑनलाइन घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे…
फेब्रुवारी २०२४ मध्ये संबंधित ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. (Teacher Eligibility Test in February dhule news)
आयबीपीएस आयटी कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याची निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते.
गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या कारभारावर संशय निर्माण झाला होता. अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. यापुढे गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली नाही. मुळातच टीईटी परीक्षेत अनेक बोगस उमेदवार सापडले असताना त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई केली गेली नाही. शासन जानेवारी अधिसूचना जाहीर करून फेब्रुवारी २०२४ ला पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहेत…
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation