जन्म दाखला ऑनलाईन भेटणार ५ मिनटात!
शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंदणी झाली असली, तरी आधारकार्ड नसल्यामुळे सरल व यूडाएस या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी ‘अपडेट’ होत नाहीत.
हे शिक्षकपदासाठी अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थी प्रवेशीत होऊन सहा महिने झाले, पण शिक्षकांची आधारकार्डाची वणवण संपेना अशी परिस्थिती झाली आहे. (Due to online birth certificate Aadhaar card does not end tension of Education Department behind teachers Nashik News)
आधारकार्डमुळे मोठ्या प्रमाणावर वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गरीब व वंचित घटकांतील पालकांची मुले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी बाळाची ग्रामपंचायतीत जन्म नोंद केली नसल्याने, त्यांचा ऑनलाइन जन्म दाखला उपलब्ध होत नाही.
परिणामी, नवीन आधारकार्ड निघत नाही. ग्रामपंचायत नोंदी नसल्याने पालकांना आधारकार्डसाठी अडचणी जाणवत आहेत. ऑनलाइन दाखला मिळविण्याची प्रक्रिया वेळखाऊ व प्रचंड खर्चीक असल्याने पालक मेटाकुटीला आले असते.
आधारकार्डसाठी जुळवाजुळव करीत गुरूजी पदरमोड करून एकदाचा शिक्षण विभागाच्या प्रशासनाचा ससेमिरा थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या बहुतांश विद्यार्थी ऊसतोडणीसाठी पालकांच्यासोबत गेली आहेत.
काही विद्यार्थांचे आधारकार्ड गुरूजींनी तयार केले. पण नोंदणीकृत पावतीवर जन्मतारीख येत असली, तरी आधारावर दिसत नसल्याने ही तांत्रिक बाब डोकेदुखी झाली. त्यामुळे शिकवणे सोडून याच कामासाठी वर्गशिक्षकांना वेळ द्यावा लागत असल्याने….
जन्म दाखला अथवा ‘बोनाफाईड’ मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पूर्वीप्रमाणे गृहीत धरावे, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, मालेगाव शहरातील शाळांच्या आधारकार्ड अद्ययावत संबंधी मंगळवारी (ता.१९) मुख्याध्यापक शिबिर होत आहे.
जिल्ह्यातील आधारकार्डची स्थिती
० अवैध- २१ हजार ८३३
० आधारकार्ड नसलेले- ३३ हजार ६१८
० प्रक्रियेमध्ये असलेले- १३ हजार ९७०
० एकूण विद्यार्थी- १३ लाख २ हजार ७४०
० आधारकार्ड असलेले विद्यार्थी- १२ लाख ६९ हजार १२२
“प्रशासन शंभर टक्के आधारकार्ड हवेत म्हणून सारखे पत्र पाठवत आहे. मात्र, अडचणी खूप आहेत. आधारकार्ड अभावी विद्यार्थी सरकारी योजनेपासून वंचित राहिल्यास शिक्षक जबाबदार धरण्यात येणार असल्याने पालकांचा व प्रशासनाचा रोष शिक्षकांना सहन करावा लागतो.”
– भास्कर भामरे, जिल्हा परिषद शाळा, नाकोडा (ता. कळवण)
“आधारकार्डासाठी जन्म दाखल्याची केलेली सक्ती डोकेदुखी आहे. पालक कामांसाठी जातात. त्यांच्या मुलांच्या जन्माची नोंद कुठेही केलेली नसते. याचा अर्थ असा होत नाही, की मुले नाहीत. पालकांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, ग्रामपंचायतीचे पत्र अथवा मुख्याध्यापकांचे पत्र त्यास ग्राह्य धरावे. जेणेकरून आधारकार्ड शंभर टक्के निघतील.”
– सविता देवरे, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, टाकळी (ता.मालेगाव)
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation