Fri. Jul 26th, 2024


दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक SSC HSC board exam time table 2024

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा १ मार्च रोजी तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा सुरू होणार आहेत….

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७६ केंद्रांवर आणि बारावीची परीक्षा जिल्ह्यातील ११४ केंद्रांवर होणार आहे.

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे. तर लेखी परीक्षा पहिल्यांदा दहावीची सुरू होईल. पुणे बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. ….

परीक्षेच्या दृष्टीने सध्या शाळांकडून तयारी सुरू असून सराव परीक्षा, प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू आहे. मागील परीक्षांचा अनुभव लक्षात घेऊन बोर्डाने विशेष पथकांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी बोर्डाच्या विशेष पथकाचा परीक्षेवर वॉच राहणार आहे. शाळांमध्येही बैठे पथके कार्यरत असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाकडून ठोस नियोजन केले जात आहे.

सरमिसळ पद्धतीची अनेकांना धास्ती

दरवर्षी नेहमीप्रमाणे एका शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यायचे. पण, एकमेकांच्या ओळखीतून कॉपी प्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली. या पार्श्वभूमीवर आता पुणे बोर्डाने यंदा परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धत’ अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच शाळेतील विद्यार्थी आता वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील. तीन किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रांवर या विद्यार्थ्यांचे क्रमांक येणार आहेत. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली असून काही शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केल्याचेही बोलले जात आहे. पण, बदल अशक्य असल्याने शाळांनी १०० टक्के निकालासाठी नोट्‌स देणे, सराव घेणे सुरू केले आहे.

इयत्ता दहावी परीक्षेचे वेळापत्रक

विषय तारीख

मराठी १ मार्च

इंग्रजी ७ मार्च

हिंदी ९ मार्च

बिजगणित १३ मार्च

भूमिती १५ मार्च

विज्ञान-१ १८ मार्च

विज्ञान-२ २० मार्च

इतिहास २२ मार्च

भूगोल २६ मार्च

इयत्ता बारावी परीक्षेचे वेळापत्रक

तारीख विषय

२१ फेब्रुवारी इंग्रजी

२२ फेब्रुवारी हिंदी

२३ फेब्रुवारी मराठी

२७ फेब्रुवारी भौतिकशास्त्र

२९ फेब्रुवारी रसायनशास्त्र

२ मार्च गणित

६ मार्च जीवशास्त्र

१५ मार्च भूगोल

१६ मार्च इतिहास

१९ मार्च सहकार

चिंता नको, आत्मविश्वास हवा

दहावी- बारावीची परीक्षा आता काही दिवसांवर आली असून विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा आहे म्हणून चिंता करू नये. नोट्‌स काढून मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. पहाटेच्या सुमारास अभ्यास करावा, पुरेशी झोप घ्यावी. महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव सतत करावा, त्यासाठी विषय शिक्षकांची मदत घ्यावी, असा सल्ला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *