Thu. Sep 12th, 2024

महाराज सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला ४०लाख मिळणार (MAHARAJ SAYAJIRAO GAIKWAD SCHOLARSHIP)

महाराष्ट्र शासनाच्या सारथी या महामंडळामार्फत महाराष्ट्रातील मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती या वर्षांपासून दिली जाणार आहे. पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका (पी जी डिप्लोमा ), त्याचबरोबर PHD चे शिक्षण घेण्याकरिता हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शेवटची तारीख:-
ऑनलाईन अर्ज करून डॉक्युमेंट अपलोड करण्याची अंतिम तारीख – १ सप्टेंबर २०२३
संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसहित सारथी संस्थेच्या पत्त्यावर पोहोचवण्याची अंतिम तारीख :- ४ सप्टेंबर २०२३

शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
– विद्यापीठाची शिक्षण फी पूर्ण रक्कम
– वार्षिक निर्वाह निधी अमेरिकेत शिक्षणासाठी & Another Country (Excluding UK) १५,४०० यु.एस. डॉलर तर UKमध्ये शिक्षणासाठी ९९०० पौड
– विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च
– वैयक्तिक आरोग्य विमा खर्च
पीएचडी- जास्तीत जास्त ४० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
पदव्युत्तर पदवी & पदव्युत्तर पदविका – जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ शिष्यवृत्ती कालावधी:

पीएचडी- चार वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदवी – दोन वर्षे किंवा प्रत्यक्ष काय अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी
पदव्युत्तर पदविका – एक वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो प्रत्यक्ष कालावधी…

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

◆वयोमर्यादा :-
पदव्युत्तर पदवी किंवा पदविका – जास्तीत जास्त ३५ वर्षे
PHD – जास्तीत जास्त ४० वर्षे

◆ शैक्षणिक पात्रता:-
१) परदेशातील विद्यापीठात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
२) परदेशातील विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली ..

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

◆ पात्र अभ्यासक्रम:-
पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी ( Post Graduation Diploma, Post Graduation and Phd )
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि फार्मसी मध्ये… लागू आहे

पात्रता निकष:….
१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
२) शैक्षणिक वर्ष ( 2023-2024 ) मध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी करिता प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन 2023 QS (QUACQUARELLI SYMONDS) रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.
३) उमेदवाराच्या पालकांचे / कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील ( 2022-2023 मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे
४) उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
५) हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्रातील मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे.

संपर्क तपशील:-
पत्ता- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411 004.
ईमेल- sarthiskvdept@gmail.com
संपर्क क्रमांक – 020-25592502.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *