Tue. Nov 5th, 2024

महिला असो की पुरुष वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणार महिन्याला 5हजार आताच अर्ज करा..

Government Scheme : आज आपण पाहणार आहोत की राज्य शासन केंद्र शासन वेगवेगळ्या जनतेसाठी नवनवीन योजना आणत असतं त्यातच आता एक योजना अशी आहे की यामध्ये महिला असो की पुरुष सात वर्षे पूर्ण झाले की तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहे याचा अर्ज कसा करायचा पात्रता का असेल निकषका असेल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाज हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने वेगवेगळे योजना सुरू केले आहेत.

उतार वयात नागरिकांना पैशांची अडचण भासू नये यासाठी सरकारने पेन्शन योजना देखील राबवली आहे. अटल पेन्शन योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी पेन्शन योजना आहे.

या पेन्शन योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दरमहा 5000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. मात्र यासाठी सुरुवातीला नागरिकांना काही पैसे गुंतवावे लागतात.

या योजनेत सहभाग नोंदवल्यानंतर नागरिकांना पैसे गुंतवावे लागतात यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झालेत की त्यांना दरमहा 5000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते म्हणजेच एका वर्षात 60000 रुपयांपर्यंतची पेन्शन नागरिकांना मिळू शकते.

अशा परिस्थितीत आज आपण अटल पेन्शन योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर ही योजना फार जुनी आहे मात्र अनेकांना या योजनेची फारशी माहिती नसल्याचे आढळले आहे. यामुळे आज आपण या योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे अटल पेन्शन योजना ?

अटल पेन्शन योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. ही पेन्शन योजना भारतातील 18 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेत जर एखाद्याने 18 व्या वर्षी गुंतवणूक केली तर त्यांना साठ वर्षापर्यंत दरमहा 210 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

जर अठराव्या वर्षी या योजनेत दरमहा 210 रुपये याप्रमाणे गुंतवणूक सुरू केली तर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदर गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे म्हणजेच एका वर्षात 60,000 ची पेन्शन मिळेल.

अर्ज कुठे करावा लागणार ?

जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी अर्ज सादर करायचा असेल आणि यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म घेऊन तो फॉर्म बँकेत जमा करू शकता. या योजनेसाठी अर्ज करणे हेतू तुम्हाला काही कागदपत्र देखील सादर करावी लागणार आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *