Sat. Jul 27th, 2024

या विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज फीस माफ होणार सरकारचा मोठा निर्णय.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण अभ्यासक्रमासाठीच शुल्क माफी करण्यात आली आहे. असे असतानाही काही महाविद्यालयांनी फक्त एकच वर्ष याची अंमलबजावणी केली. उर्वरित वर्षांसाठी विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्क आकारल्याचे समोर आले आहे.

याची गंभीर दखल घेत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठांकडून अहवाल मागितला असून, सूचनांचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. डॉ. देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे,‘‘२८ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कुलगुरू यांनी दिलेल्या सहमतीनुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे आई, वडील, पालक कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे-विद्यार्थिनीचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच संपूर्ण शुल्क माफ करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे.’’२०२०-२१२०२२-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये याप्रकरणी किती विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे, याबाबतची वर्षनिहाय माहिती या संचालनालयास पाठवावी, असे सांगण्यात आले आहे.

हे शुल्क देखील माफ
– जिमखाना शुल्क

– विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क

– कॉलेज मॅगझीन शुल्क

– संगणक शुल्क

– क्रीडा निधी

– वैद्यकीय मदत निधी

– युथ फेस्टीवल

हे शुल्क ५० टक्के माफ
प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

परीक्षा अर्जास अडवू नये
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ टप्यात भरण्याची सवलत देण्यात यावी, तसेच शुल्क थकीत असेलतर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी ताकीदही देण्यात आली आहे.

शासनाचे पत्र असतानाही काही विद्यापीठांमध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. तो पर्यंत विद्यापीठांना शुल्क घेता येणार नाही.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *