Fri. Jul 26th, 2024

या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणारः सरकारचा मोठा निर्णय!

शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यासाठी राज्य सरकारने आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे शहरात राहून उच्च शिक्षण घेण्याऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.

शासनाने आज उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरू केली आहे. त्या माध्यमातून एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता ओबीसी विद्यार्थ्यांना ही मिळणार असल्याचे आहे..

ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा एससी आणि एसटी वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र आता शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे.

राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे शासनाने त्या संदर्भातला जीआर ही आज काढला आहे…..

कशी असेल आधार योजना?

• मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामागे 60 हजार रु मिळतील.

• संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रु मिळतील.

• जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रु मिळतील.

• तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याना 38 हजार रु मिळतील.

• या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जातील.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *