Tue. May 21st, 2024

‘या’ 10 कारणांमुळे मुलं होतात गणितात नापास

National Mathematics Day : गणित हा कठीणच विषय आहे हे साधारण प्रत्येकाच्या तोंडचं वाक्य आहे. खरतर सर्वात वाईट विषय कोणता हे विचारलं की, अनेक लोक गणिताकडे बोट दाखवतात.

पण खरतर असं काही नाहीये. हा सगळा मनाचा खेळ आहे. सगळ्याच पालकांना आपल्या मुलाचं काय करावं हा प्रश्न असेलच. खूप मुलं गणितात कच्चे असतात, पण याचं नक्की कारण काय? रिपोर्ट्स नुसार ही 10 कारणं याला कारणीभूत असतात.

1. मुलांचा त्या विषयाबद्दलचा दृष्टीकोन

सर्व काही त्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांची मानसिकता महत्त्वाची आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने सुरुवातीपासूनच विचार केला की, तो गणित विषयात कच्चा आहे तर, शेवटी त्याला याचा फोबिया होणारच आहेत…

2. शिकवण्याची पद्धत

सगळ्याच शिक्षकांची शिकवण्याची पद्धत सारखी नसते, त्यामुळे गणित शिकवण्याच्या पद्धतीवरदेखील त्यात रूची निर्माण होणे अवलंबून असते. शिकवण्याची पद्धत योग्य असल्यास, विद्यार्थी कॅल्क्युलेटर न वापरताही बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार करू शकतील. पण अनेकदा गणिताचे शिक्षकच कॅल्क्युलेटरवर अवलंबून असतात. पण जर त्यांनीच पेन आणि कागद वापरला आणि हातावर आकडेमोड केली तर अस काही होणार नाही आहे

3. विषयाबद्दल गोडी न वाटणं

विद्यार्थी गणितात नापास होण्याच्या अनेक कारणांपैकी एक त्याला त्या विषयाची गोडी नसणं किंवा त्याबद्दल भीती वाटणं. अशात ते तासाला न बसणं जास्त पसंत करतात आणि त्यांची गणिताशी गट्टी होत नाही.

4. आत्मविश्वासाची कमतरता

विद्यार्थी गणितात नापास होण्याच आणखी एक कारण म्हणजे समवयस्कांचा दबाव आणि आत्मविश्वासाची कमतरता. इतर चांगल्या विद्यार्थ्यांशी सतत तुलना केल्याने आत्म-संशय वाढतो. एकदा का आत्मविश्वास कमी होऊ लागला की तो परत मिळवणं कठीण होत.

प्रत्येक विद्यार्थ्याला  ५०हजार रूपये मिळणार…  👇👇

5. कमी IQ

अनेकांना पटणार नाही. पण गणित शिकण्यात एखाद्याचा बुद्ध्यांक किती भूमिका बजावतो याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तसं आपल्याकडे कोणीही हे मानत नाही की, आपल्या मुलाचा IQ कमी असू शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, काही मुलांमध्ये इतरांप्रमाणे सहजतेने समजून घेण्याची क्षमता नसते. त्यांचं कमी IQ त्यांच्या शिकण्याच्या आलेखावर परिणाम करतो.

6. मन न लागणे

काही विद्यार्थी सहज विचलित होतात. पूर्ण गणिताच्या तासाला ते लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांचे लक्ष भटकते आणि त्यांना पुढचं काही समजत नाही. पालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा मुलगा पूर्णवेळ अभ्यासात लक्ष देतो आहे का?

7. गणिताचे समीकरण आणि चिन्हांबद्दल कन्फ्युजन

गणित हा अवघड विषय आहे. विशेषत: जेव्हा समीकरण, चिन्हे आणि वेगवेगळ्या आकारांचा विषय येतो. असे बरेच मुलं आहेत ज्यांना कन्फ्युजन होत.

8. शिक्षक विद्यार्थी रेशो

साधारणपणे, एका वर्गात 30-40 विद्यार्थी असतात आणि एकच शिक्षक हा विषय शिकवतो. याचा परिणाम शिक्षकाला प्रत्येकाकडे लक्ष देता येत नाही. कोणता विद्यार्थी चांगला आहे आणि कोणता सरासरीपेक्षा कमी आहे याची त्याला केवळ अस्पष्ट कल्पना आहे.

9. पारंपरिक शिक्षण पद्धती

थोडसे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विषय शिकवणं आता गरजेचं आहे. वर्षानुवर्ष एकाच पद्धतीने विषय शिकवला तर तो मुलांना आवडेलच अस नाही. असे अनेक शिक्षक आहेत जे पारंपरिक पद्धतीने गणित शिकवतात त्यांचंच मुळात गणित थोड कच्च असतं.

10. प्रवेशयोग्य पुस्तक

अशा अनेक शाळा आहेत जिथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घेणे परवडत नाही. पाठ्यपुस्तक-विद्यार्थी रेशी क्रमाने असेल तर विषय शिकवणे अवघड नाही. जर परिस्थिती उलट असेल तर, जिथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळवण्यासाठी शाळेवर अवलंबून राहाव लागत त्यांना हा त्रास होणारच आहे. या समस्यांचे उपाय योग्य वेळी शोधून काढल्या तर त्या सोडवता येतील. विद्यार्थ्याची कामगिरी सुधारण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *