Sat. Dec 7th, 2024

राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या  मुलांची 50%फिस सरकार भरणार. सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी

राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम राज्य सरकारने द्यावी. अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षापासून आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेशावर जाहीर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा राज्यातील इंग्रजी शाळा संस्था चालकांच्या संघटनांनी दिला आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान इंग्रजी माध्यम शाळा संस्था चालकांच्या संघटनांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यातील खासगी इंग्रजी शाळांना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून शुल्क प्रतिपूर्ती मिळालेली नाही.

शुल्कप्रतिपूर्तीची रक्कम सरकारने तातडी द्यावी, या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. 

या जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम राज्य सरकारमार्फत देण्यात येते. परंतु गेल्या सहा वर्षांपासून शाळांना ही रक्कम सरकारने दिलेली नाही.

शाळांना ही शुल्क प्रतिपूर्ती न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा निधी लवकरात लवकर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना द्यावा, अशी आग्रही मागणी इंग्रजी माध्यम शाळा चालक संघटना ‘मेस्टा’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांनी केली आहे.

या धरणे आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव दळवी, कार्यकारी सचिव खेमराज कोंडे, नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. मोहन राईकवार, कपिल उमाळे, अनिल मोगरे, आदी सहभागी झाले होते.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *