Fri. Jul 26th, 2024

वकील कसं बनायचं, किती मिळतो पगार? Lawyer Career..

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना स्थिर करिअर हवं असेल तर कोर्टात वकीली करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रोफेशनमध्ये चांगले पैसे आणि प्रतिष्ठा मिळते. आज आपण या बातमीच्या माध्यमातून वकील होण्यासाठी काय करावे लागेल?

त्यासाठी कोणता कोर्स करणे आवश्यक आहे? कोर्सची फी काय असते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहो…..

वकीलाचे काम काय असते?

तुम्हा सर्वांना वकीलाचे कार्य माहिती असेल. मात्र सोप्या भाषेत सांगायचे झाल्या वकिलाचे मुख्य कार्य हे लोकांना कायदेशीर सल्ला देणे, सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात प्रभावीपणे सादर करणे हे आहे. आपल्यापैकी अनेकांना कोर्टात बोलण्याची सवय नसते. अशावेळी तुमची बाजू मांडण्याचे काम वकील करतो. वकिलाचे प्रमुख काम हे कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊन त्याच्या अशिलाला घटनात्मक मार्गाने न्याय मिळवून देणे हे असते …..

कोण बनू शकते वकील ?

वकील बनण्यासाठी 45 टक्क्यांसह 12 वी पास असणे आवश्यक आहे. 12 वी नंतर LLB हा कोर्स केल्यानंतर वकील बनता येते. या कोर्स पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला अनुभवी वकिलांसोबत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर तुम्ही वकीली सुरू करू शकता. वकील बनण्यासाठी तुमचे भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे, तसेच वादविवाद करणे, कोणत्याही मुद्द्यावर बोलणे, निर्णय घेण्याची क्षमता असणे हे गुणही तुमच्यात असायला हवे…..

वकील कसे बनायचे?

सर्वप्रथम चांगल्या गुणांसह 12 वी व्हा. त्यानंतर CLAT परीक्षेची तयारी करा, या परिक्षेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित याविषयी प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला LLB कोर्ससाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. बारावीनंतर हा कोर्स 5 वर्षांचा असतो. तर पदवीनंतर हा कोर्स 3 वर्षांचा असतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही वरिष्ठ वकिलाचे सहाय्यक म्हणून काम करु शकता किंवा वकील म्हणूनही काम करू शकतात

पगार किती ?

सरकारी वकीलाचा पगार त्याच्या अनुभवावर अवलंबून असतो. तो सरासरी वार्षिक 5 लाखांच्या आसपास असू शकतो. तर खाजगी वकीलांचा पगार त्याला मिळणाऱ्या अशिलांवर अवलंबून असते. तर काही वकील दिवसाला हजारो रुपये फी घेतात. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *