.
संयमाची परीक्षा!! तब्बल ३५ वेळा नापास, तरी हार नाही मानली; जिद्दीने झाला IAS
UPSC IAS Success Story : यशाच्या शिखरावर चढत असताना अपयश झेलावे लागतेच. आपल्या चूकातून योग्य वाट काढली तर अपेक्षांसह यश हे मिळतेच. हे आयएएस विजय वर्धन यांनी दाखवून दिले आहे.त्यामुळे आपण अपयश स्वीकारून आणि त्यातून लक्ष केंद्रित करा. तुम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. एक-दोन परीक्षा हरल्यानंतर काही लोक निराश होतात, तर हरियाणाच्या या मुलाने ३५ परीक्षांमध्ये नापास होऊनही आपला आशावाद कायम ठेवला.
विजय वर्धन यांनी हरियाणा राज्यातील सिरसा येथील शाळेत शिक्षण घेतले, जिथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने हिस्सारमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक हे शिक्षण पूर्ण केले. या अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर, विजय वर्धने युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेले. त्याने हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएल यासह तीस परीक्षांचा प्रयत्न केला, परंतु त्यातील प्रत्येक परीक्षा तो नापास झाला. त्यानंतर, तो निराश झाला पण लढत राहिला. त्याने हार मानली नाही.
वर्धनने २०१४ मध्ये पहिल्यांदा युपीएससी परीक्षेचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्याने एकापाठोपाठ एक असे सलग चार वेळा प्रयत्न केले, परंतू प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला.२०१८ मध्ये, त्याच्या प्रयत्नांना अखेर फळ मिळाले. युपीएससी उत्तीर्ण होऊन त्यांनी १०४ वे ऑल इंडिया रँक (AIR) प्राप्त केले आणि त्यांची आय.पी.एस म्हणून नियुक्ती झाली आहे..
विजय वर्धन मात्र त्यांच्या आयपीएस पदावर खूश नव्हते, म्हणून २०२१ मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षेसाठी पुन्हा अर्ज केला आणि आय.ए.एस होण्यासाठी पास झाला.अखेरीस, ३५ वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, तो यूपीएससीमध्ये १०४ वा क्रमांक मिळवू शकला. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कोणताही निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास असायला हवा. मग यश हे नक्कीच मिळते…
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation