१०वी पास विद्यार्थ्यांना महिन्याला 5हजार मिळणारं आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांना महिन्याला पाच हजार रुपये कसे मिळतील याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे कोणते विद्यार्थी पात्र असतील त्याची वयाची अटक असेल शिक्षणाची अटक असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. या वर्षीचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही अशीच एक योजना जाहीर केली होती. देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने इंटर्नशिप स्कीम सुरू केली आहे. ही योजना याच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. यातून तरुणांना देशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सरकार अशा तरुणांना ५ हजार रुपये महिना मानधनही देणार आहे.
अनेक कंपन्यांनी यासाठी आखणी सुरू केली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या वेसाईट्सवर भरती प्रक्रियाची माहिती दिली आहे. मात्र, तरुणांसाठी हे पोर्टल १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या इंटर्नशिप योजनेचा सुमारे एक कोटी तरुणांना फायदा होईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. त्यांना देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळेल.
CII आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा कार्यक्रम
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, देशभरातील कंपन्या या योजनेबद्दल उत्सुक आहेत. या योजनेच्या यशासाठी भारतीय उद्योग परिसंघ (CII) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासोबत काम करत आहे. अहवालानुसार, कंपन्यांचा ३ वर्षांचा CSR (Corporate Social Responsibility) खर्च विचारात घेऊन या योजनेत समाविष्ट केला जाणाप आहे. हे पीएम कौशल्य आणि रोजगार विकास पॅकेज अंतर्गत आणले जात आहे.
कोणाला मिळणार संधी?
१०वी उत्तीर्ण २१ ते २४ वयोगटातील युवक या योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, तो बेरोजगार असला पाहिजे. याशिवाय आयआयटी, आयआयएम, आयआयएसईआर, सीए आणि इतर कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकणार नाहीत. याशिवाय सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबातील तरुण आणि ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही इंटर्नशिप योजनेत समाविष्ट केले जाणार नाही.
कसा करायचा अर्ज?
इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला पोर्टलवर जाऊन तुमचे प्रोफाइल तयार करावे लागेल. या ठिकाणी आधार कार्डद्वारे ई-केवायसी करावे लागेल. यासह, तुम्हाला तुमच्या पात्रतेसह एक घोषणा फॉर्म देखील द्यावा लागेल. यानंतर, पोर्टलद्वारे प्रत्येक पदासाठी दुप्पट उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर कंपन्या त्यांच्यामधून योग्य लोकांची निवड करतील आणि त्यांना ऑफर लेटर पाठवतील. यामध्ये ५० टक्के प्रशिक्षण कामाचं असणार आहे. इंटर्नशिपचे १२ महिने पूर्ण झाल्यानंतर, तुमचे प्रमाणपत्र पोर्टलवरच अपलोड केले आहेत
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://pminternship.mca.gov.in/login